"अं..कोन ? .. थांबा हं
दादा एकच मिनिट
.."
आहो सुयांच्या वेदना जश्या सहन केल्यात तश्या ईत्कुल्या हातांच्या घट्ट मिठीतल्या सुखद संवेदना पण अनुभवल्या.
आता मी देवाला मनापासून सांगते की पुढचा जन्म देशील तो पण एक school-kit / दप्तराचाच दे , असच एखाद्या गार्गी आणि तिच्या शिक्षणाची सोबत मिळू दे । "
"गार्गी
गार्गी अग ए
गार्गी ..थांब न
हळू चाल जरा..
मला बोलावतय कुणी इकडे
मागे..बोलते जरा
त्यानच्याशी.."
" ह
बोला दादा, हो
मीच ती स्कुल
किट ..हो हो
दप्तर माझच दुसर
नाव .... J
किती बर वाटतय
कुणी मोठ माझ्याशी
बोलतय.. सगळ्याना वाटत काय
असणार ह्या दप्तरची
कहाणी..तुम्हाला ऐकायची ?
आहो सुयांच्या वेदना जश्या सहन केल्यात तश्या ईत्कुल्या हातांच्या घट्ट मिठीतल्या सुखद संवेदना पण अनुभवल्या.
चला चालता चालता सांगते
तुम्हाला माझी हकीकत “
“अं …कुठुन बर सुरु
करू …. बर्र सुरवातीपासूनच
सुरु करतेय ..
माझे डोळे उघडले
ते ' तोतान कुमारच्या’ Machine टेबल
वर … तुमच कस
ते मेटर्निटि वार्ड
का काय म्हणता
… तसच आमच हे
टेबल …' तोतान' आणि त्याचे
कारीगर आम्हाला घडवत होते.
सेवा सहयोग म्हणून कोणतरी
का काहीतरी असं
कानावर पडलं … त्यांनी म्हणे
हज्जारो दाप्तरांची ओर्डर दिली
होती अस ऐकल.
का बर असावा
हा सागळा उपद्व्याप
काहीच कळत नव्हत
तेव्हा.
विचार करत होते
तेवढ्यात कारागिराने machine वर घेतलं
,आणि सुया टोचून
टोचून शिवण मारू लागला मला.… आईगं
…कित्ती दुखलं म्हणून सांगू
….का का बर
देवाने मला दाप्ताराचा
जन्म दिला अस
मनात येउन गेल.
टक टक machineच्या सुयांचा
हल्ला आणि मग कात्रीचे धार धार घाव
…जोरात विव्हळलेच मी - देवा
शत्रूला सुद्धा हा असा
दप्तराचा जन्म नको
देउस. जन्माला येता
येता इतकं दुखं
इतक्या वेदना.
अर्ध्या
तासानी माझ्यावरच ते operation संपल
एकदाच …
मस्त आकाशी निळ्या रंगाची
मी , दोन छान
लोंबकळणारे हात , आत दोन
कप्पे ,बाजूला दोन जाळीदार
खिसे आणि कपाळावर
उठून दिसणारी 'Seva Sahayog' ची
टिकली … अशी मी
नटून तयार झाली.
छातीत धड धड
चालू होती की
पुढे काय करायचं
, काय होणार …. आजून
वेदना होणार का ?
पुढचा एक दिवस
मी आणि माझ्या
बहिणी एका खोलीत
रहिलो. काही माझ्या
सारख्या निळ्या तर काही
पिवळ्या धम्मक आणि काही
लाल चुटूक .
कुणालाच
माहित नव्हत पुढे
कशाला सामोरं जायचय
. दुसर्या दिवशी एका truck मध्ये
आम्हा सगळ्या जणींना
बसवलं …. आत पूर्ण
काळोख , कुठेय जातोय काहीच
माहित नाही . वळणा
वळणा वर आम्ही
एकमेकींवर पडत होतो
, तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्या सगळ्या
जणींच्या गमती जमती
सुरु होत्याच . टिवल्याबावल्या
करत असतानाच आमचा
truck कुठेतरी येउन थांबला
. Truckवरचा पडदा उघडला
….
आणि बघते ते
कय…… समोर ही भली मोठी
तरुण मुला मुलींची
गर्दी की
हो.
सगळेजण आमच्याकडे अस नवलाईने
बघत होते … ईशः
… तेव्हा इतकं लाजायला
झालं सांगते मी
…
हीहीही J
मग त्यातले
दोघे बापे truck मध्ये
चढले , बाकीच्यांनी लांबच लांब
रांग केली , आणि
आम्हाला truck मधून उतरवू
लागले.
प्रत्येक
जण आम्हाला हातात
घेऊन न्ह्याळत होत.
एक एक करून
सगळ्यांना मोठ्या workshop मध्ये ठेवलं , सगळ्या
खाली उतरलो तेव्हा
सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एवढ मस्त स्वागत
झालं की मी
तर भारावूनच गेले.
छातीतली धडधड जर्रा
कमी झाली. आपल्या
सभोवताली चांगली माणसे आहेत
हे त्यांच्या स्पर्शावरून
आणि आनंदावरून लक्षात
आल.
कोण बर होती
ही सगळी माणस
? तीनशे चारशे तरी असावी
बहुदा. अगदी आजी
आजोबांपासून ते चिमुरड्या
पोरांन पर्यंत , स्मार्ट तरुण
तरुणी होत्या , काका
- काकू पण होते.
वेगवेगळे
दिसणारे पण प्रत्येकाच्या
चेहेर्यावरती एकसारखी प्रसन्नता . आगदी
बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर भक्ताच्या
चेहेर्यावर असते ना
तशी काहीशी.
मग एक कर्कश
अशी शिट्टी वाजली
आणि एक सज्जनसे
गृहस्त , 'अतुलजी' म्हणत होते
सगळे त्यांना, त्यांनी
सर्वाना माहिती सांगायला सुरवात
केली… सगळी माणसं
आणि आम्ही सर्व
जणी सुद्धा गप्प
बसून ऐकत होतो
.
अच्छा तर अस
होत हे सगळ
… अतुलजींच्या बोलण्यातून कळल कि
ही सर्व वेगवेगळ्या
कंपनी , वेगवेगळ्या ठिकाणहून जमलेली
volunteers अहेत. इकडे सेवा
सहयोग च्या School-kit assembly साठी जमलेली
… म्हणजे आमच्या साठी इतकी
सारी मंडळी …वाह
… दिल खुश झाला
….!!
एवढ्या सगळ्या आम्हा दाप्तराना
तयार करून वेगवेगळ्या
NGO -संस्थांच्या मुलांसाठी पाठवणार असा
ह्यांचा बेत होता
… आता हे NGO काय
अस्त , तिथली मुलं कशी
हे बाई मला
कोडच होत अजून.
सेवा सहयोग कस गरीब
मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम चालवत
, School-kit , समुत्कर्ष वगरॆ अतुलजीनी
समजावलं. आता कळायला
लागलं की हा
गोतावळा कशासाठी ते.
मग तो school-kit लीडर सांगू
लागला की आज
काय आणि कस
काम करायचं. आपल्याबरोबर
आता काय होणार
हे त्याच्या बोलण्यातून
स्पष्ट झालं.आमची
Quality चेक करणार सुरवातीला म्हणे
, आमच्यातल्या defective बाजूला काढणार , मग
आमच्यात वह्या ,
compass box भरणार , पुन्हा quality चेक करून
stack करणार अस कळल.
त्याच बोलणं पूर्ण होताच
लागली की सगळी
मंडळी कामाला.
बरेचजण तीन ओळीत
बसली. काही जण
Godown मधून आम्हाला बाहेर आणून
ह्या ओळीत बसलेल्यांच्या
समोर ठेवू लागली.
अगदी शिस्तीत निटनेटकेपणाने
काम चालू झालं.
ओळीमध्ये
बसलेले आम्हा एकएकीला हातात
घेऊन नीट चेक
करू लगले.
मला एका दादाने
हातात घेतल, आगदी
प्रेमाने माझ्याकडे बघितल , मग
माझ्या चेन्स तपासल्या , आतमध्ये
डोकावून माझे कप्पे
चेक केले. माझे
लोंबकळणारे हात नीट
बक्कलला अडकवले. माझ्याकडे बघून प्रसन्नतेने हसला. हे सगळं
करता करता बाजूच्या
काकुंशी त्याच्या गप्पा चालू
होत्या. काकू
होत्या मराठी आणि हा
तेलगु , दोघांना एकमेकांची भाषा
कळत नव्हती तरी
सवांद छान साधला
गेला होता. तेव्हा
कळल की संवाद
साधण्यासाठी भाषेची गरज असतेच
अस नाही.
बाजूला काकूंच्या हातातली माझी
मैत्रीण , तिची एक
शिवण उसवलेली काकूंना
सापडली , लगेच खडूने
तिच्यावर खुण करून
बाजूला ठेवल. अहो अहो
तिला वाईट वाटल
ना. मग मीच
तिला समजावलं. पण
ताटातूट होणार ह्याने माझेच
हृदय भरून आल.
तेवढ्यात
एका ताईने उचलून
मला दुसर्या ओळीत
ठेवलं. इकडे एका
१०-१२ वर्षाच्या
चुणचुणीत पोराने मला उचललं
, समोर वह्यांचा ढीग होता
त्यातल्या ९ उचलून
माझ्या कप्यात ठेवल्या …. वाह
सोबती मिळाले . सुरवातीला
काय बोलावं कळलंच
नाही … मग "Hi" केलं तर
सगळ्या वाह्यानी एका स्वरात
"hello" केल. हाहाहा … लगेच गट्टी
जमली आमची.
पुढे एका आजोबांनी
एक compass box माझ्यात ठेवली. एकदम
बोल्ड आणि beautiful होती
ती. पिवळी धम्म
, आणि तिचे सवंगडी
होतेच तिच्याबरोबर - कर्कटक
, पेन्सील, खोड रब्बर
, पट्टी , शार्पनर.
आल्याआल्या
लगेच तिने मला
shake-hand केला , Wow अशी स्मार्त
मैत्रीण आणि सोबतीला
वह्या , मस्त वेळ
जाणार हे लक्षात
आल. आमच्या गप्पा
, टिवल्याबावल्या , खुडबुड चालू झाली.
पुढे एका ताईने
आम्हाला नीट तपासून
घेतलं आणि zip नीट
बंद करून बाकी
schoolkitsच्या ढिगार्यावर नीट ठेवल.
अर्र ….
परत ती कर्कश
शिट्टी…. सगळीकडचा गोंगाट शांत
झाला. एक सद्गृहस्थ… अं … नितीनजी नाव होत
त्यांचं आणि स्मार्टश्या
माणिक ताई , दोघ
गीत सादर करणार
होते.
नितीनजीनच्या
खडा आवाज , रुबाबदारपणा…
मी तर पहातच
राहिले … त्यांच्या मागे सगळेच
म्हणू लागलो "गलत
मत कदम उठाओ
, सोच कर चलो
.विचार कर चलो
, राहकी मुसीबतोको पार कर
चलो "
वाह काय सुंदर
गीत . काय प्रस्सन
वातावरण तयार झाल
म्हणून सांगू. थकलेल्या volunteersना
पुन्हा हुरूप आला. शिट्टी
वाजली आणि पुन्हा
३०० लोकांचे हात
कामाला लागले.
मग गुरुकुलम नावाच्या संस्थेचा
एक टेम्पो आला.
लगेच १५-२०
तरुणांनी रांग केली
आणि ढिगातून आम्हा
एकेकीला टेम्पो मध्ये ठेवलं.
ओह , आम्हाला घेऊन जाणार
इथून L नको ना
… कित्ती छान लोकं
होती ही आजूबाजूला
, कित्ती मज्जा येत होती
… का घेऊन जाताय
दुसरीकडे ?
जन्माच्या
वेळी झालेल्या वेदना
अत्ताकुठे ह्या सर्वांच्या
प्रेमळ स्पर्शाने दूर होत
होत्या , परत कुठे
पाठवताय?
पण आमचं कुणी
ऐकत नव्हत. टेम्पोचा पडदा बंद
झाला आणि आणखी
एक प्रवास सुरु
झाला.
पण ह्यावेळी मात्र मी
एकटी नव्हते , सोबतीला
वह्या आणि compass box होती.
एकमेकांना घट्ट मिठी
मारून आम्ही सर्व
पुढे काय होईल
त्याला सामोरे जायला तयार
झालो.
ह्यावेळी
पडदा उघडला तेव्हा
दृश्य वेगळच होत.
इकडे पण गर्दी
होती पण लहानग्याश्या
मुलामुलींची.
इवलेइवले
ते टपोरे डोळे
आमच्याकडे कुतूहलाने बघत होते.
कोणती bag आपल्याला मिळणार ह्या
आनंदात ती सर्व
होती.
मग शिक्षकांनी आम्हाला एका
खोलीत नेउन ठेवलं.
दुसर्या दिवशी 'Distribution' होणार होत म्हणे.
दुसरा दिवस उजाडला
आणि पुढे काय
ह्याच्या गप्पा आम्ही मारू
लगलो. पुन्हा कुठे
नेणार का ? मागे
भेटली तशी छान
माणसं भेटणार का
? कस होणार ? काय
होणार ? प्रश्नांची शृंखला मनात
चालू असतांनाच पुन्हा
एकदा प्रसन्न चेहर्याच्या
volunteersनी आम्हाला पटांगणात आणलं.
परवाच्या volunteers मधली काही
तर काही नवीन
होते. समोर सर्व
शाळकरी मुलं मुली स्वच्छ तयार होऊन
उत्साही चेहेर्याने बसली होती.
मुख्याध्यापकांच्या
भाषणानंतर volunteers आम्हा एकेककीला मुलांमध्ये
वाटू लागले. एका
दादाने मला घेऊन
एका सगळ्यात गोंडस
छकुलीच्या हातात दिलं
काही क्षण आम्ही
दोघी एकमेकीनकडे बघतच
राहिलो … आणि मग
… तो सुंदर क्षण
… जेव्हा गार्गीने मला घट्ट
मिठी मारली … हो
हीच ती गार्गी
जिची मी झाले.
ती घट्ट जिव्हाळ्याची
मिठी , तो क्षण
कधीच विसरू नाही
शकणार … आमच्या दोघींचे डोळे
आनंदाने भरून आले….
ते सुयांचे घाव
, त्या कात्रीच्या जखमा , ती
भविष्याची धडधड , सगळ्या सगळ्या
वेदना एका क्षणात
पार विरून गेल्या
…. गार्गी आणि माझी
जन्मभराची गट्टी जमली … आता
गार्गीच्या अभ्यासात माझी होणारी
मदत , तिची गोड
सोबत ह्याने जीवनाचे
सार्थक झाले.
बरका हो दादा
…. ऐकताय ना …
